शनि प्रदोष व्रताचे धार्मिक महत्त्व


 मोराणे धुळे प्रतिनिधी- प्रकाश नाईक* 

 *मोराणे* :-भारतीय धर्मसंस्कृती ही विविध व्रत-उपवासांच्या परंपरेवर आधारलेली आहे. प्रत्येक व्रतामागे एखादी कथा, तत्त्वज्ञान आणि भक्ताला दिशा देणारा संदेश दडलेला असतो. त्या परंपरेत प्रदोष व्रत विशेष मानले गेले आहे. प्रदोषकाळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी व नंतरचा दोन तासांचा काळ. हा काळ भगवान शिवाला अती प्रिय मानला जातो. प्रदोष व्रत सोमवारी, मंगळवारी, बुधवारी इत्यादी दिवशी येतो; परंतु जेव्हा हा प्रदोष शनिवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला शनि प्रदोष व्रत असे संबोधले जाते आणि या व्रताचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढते.

पुराणकथेनुसार, एका वेळी चंद्रमा शनीच्या दृष्टीने ग्रस्त झाला होता. त्याच्या तेजाला ग्रहण लागले होते. तेव्हा सर्व देवता शिवाच्या शरण गेल्या. भगवान शिवांनी शनिदेवांना सांगितले की, ज्याने प्रदोषकाळी माझी उपासना केली, त्या भक्तावर तू कोमल दृष्टी ठेव. त्यानंतर शनिदेवांनी मान्य केले की, जो शनिवारच्या प्रदोषकाळी शिवपूजन करेल, त्याच्या जीवनातील शनीदोष कमी होतील. तेव्हापासून शनि प्रदोष व्रताची प्रथा सुरू झाली.

व्रताची पूजनपद्धती :-

या दिवशी भक्त दिवसभर उपवास करून संध्याकाळी स्नान करून मंदीरात जातात. प्रदोषकाळी भगवान शिवाची पूजा केली जाते. शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध, घी यांचा अभिषेक केला जातो. बिल्वपत्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण केले जाते. त्यानंतर "ॐ नमः शिवाय" किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो.

शनिदेवाला तेल, काळे तीळ, उडीद आणि लोखंडाचे दान करणेही अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान केले तर शनीची प्रसन्नता मिळते

शनि प्रदोषाची पार्श्वभूमी

प्रदोष व्रताचे मूळ भगवान शिवाशी संबंधित आहे. पुराणकथेनुसार, समुद्रमंथनावेळी निघालेल्या हलाहल विषाचा प्रचंड परिणाम होत असताना देव-दानव भयभीत झाले होते. त्या वेळी भगवान शिवांनी ते विष पिऊन आपले कंठ निळे केले. हे कार्य प्रदोषकाळात झाले असे मानले जाते. त्यामुळे प्रदोषकाळ हा शिवाची आराधना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

शनिवारच्या दिवशी प्रदोष येणे हे विशेष मानले जाते कारण शनिदेव हे कर्मफळ देणारे देव आहेत. ज्याच्या जीवनात दुःख, संकटे किंवा शनीची साडेसाती-अष्टम शनीचा त्रास आहे त्याने या दिवशी शिव-शनि पूजन केल्यास त्याचे सर्व क्लेश कमी होतात.

धार्मिक महत्त्व शनि प्रदोष व्रत हे केवळ उपवासापुरते मर्यादित नाही, तर ते एक साधना आहे. या व्रतामागे काही महत्त्वाचे धार्मिक अर्थ दडलेले आहेत.

या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक, बिल्वपत्रार्पण व रुद्राभिषेक करून भक्त शनीच्या रौद्र प्रभावाला शांत करतो. शनिदेव स्वतः शिवभक्त मानले जातात. त्यामुळे शिवपूजेसोबत शनिदेवाचे पूजन केल्याने भक्ताच्या जीवनातील क्लेश निवळतात. या व्रतामुळे आयुष्य निरोगी, समृद्ध आणि पापमुक्त होते, असे मानले जाते.

नाव :-अश्विनी विलास गायकवाड

वर्ग :- FY.BSW

महाविद्यालयाचे नाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (नकाने) धुळे

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार