पन्नालाल सुराणा हे वंचितांचे आधारवड

धुळे:- प्रा. डॉ. सुदाम राठोड दिनांक ०९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मा. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ सर यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा आणि कष्टकऱ्यांचे आधारवड बाबा आढाव यांच्या अल्पशा आजारा नंतर निधन झाल्यामुळे समाजवादी परिवार दुःखाच्या खाईत लोटला आहे असे विधान राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्र सेवा दलाचे परिवर्तनवादी शिलेदार पन्नालाल (भाऊ )सुराणा यांच्या स्मृती जागवल्या. ज्यामध्ये पन्नालाल सुराणा आणि राष्ट्र सेवादल हे एक सूत्र बनले होते. त्याचाच परिणाम म्हणून लातूर उस्मानाबाद भूकंप ग्रस्तातील अनाथ मुलांसाठी *आपलं घर* हे अनेक मुलांना आजही निरंतर जीवन शिक्षण देत आहे. याबाबत सविस्तर माहिती दिली आणि राष्ट्र सेवा दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच मोराने धुळे येथील भाऊंचे नाते अभंग होते व म्हणूनच पन्नालाल सुराणा यांनी देश सेवेसाठी आजन्म सेवा केली याचाही उल्लेख केला.

   कष्टकऱ्यांचा आधारवड, समतावादी समाज रचना निर्माण व्हावी यासाठी काम करणारे बाबा आढाव जे वंचिता साठी आयुष्यभर कार्यरत राहिले या दोन्ही समाजवादी विचारधारा जपणाऱ्या विचारवंतांच्या निधनाने देश पोरका झाला अशा भावना या अभिवादन सभेमध्ये प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी व्यक्त केल्या. 

 अभिवादन सभेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर,प्रा. डॉ. सुदाम राठोड व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी केले. सदरील अभिवादन सभेमध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार