धुळे - दिनांक: ११ एप्रिल २०२६ ठिकाण एस.एस.व्ही.पी.एस. इंजिनिअरिंग कॉलेज, धुळे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त “उमंग खेळ महोत्सव – ‘Give to Gain’” अंतर्गत आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन महिलांना शिक्षण, कौशल्य विकास व शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात नोंदणी व स्वागतगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विविध मान्यवरांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण व स्वावलंबन या विषयांवर मार्गदर्शन केले.
सौ. दिपाली देसले मॅडम, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी एकात्मिक बाल विकास कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत महिला सक्षमीकरणाबाबत आपले विचार मांडले.
डॉ. हितेंद्र पाटील, प्रिन्सिपल एस.एस.व्ही.पी.एस. इंजिनिअरिंग कॉलेज यांनी महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांना शिक्षणाबाबत जागरूक केले.
श्री. आर. बी. सिंह यांनी एचजी फाउंडेशनबाबत माहिती दिली, तर श्री. गुरुनाथ सावंत यांनी “निदान” संस्थेची ओळख करून दिली.
कार्यक्रमात शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच प्रदर्शन भिंतीचे उद्घाटन, सहभागी महिलांचे भाषण, फॅशन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
दुपारनंतर विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर कार्यक्रमास काळखेडे गावच्या माजी सरपंच मनीषा मोरे, राजू मोरे, महिला बचत गटाच्या ज्योती मोरे, ज्योती शिंदे, सविता निकम तसेच बिलाडी झेडपी स्कूलच्या चौधरी मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक व प्रमाणपत्र वितरणाने करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरणा मिळाली, असे गुरुनाथ सावंत यांनी सांगितले.

