मोराणे प्रतिनिधी मोराणे दि. 05- 05- 2026 डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे येथील स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल अंतर्गत टाटा समाज विज्ञान महाविद्यालय मुंबई यांच्या सहकार्याने महिला आणि बाल कल्याण विभागा अंतर्गत समुपदेशक या पदासाठी आयोजित कॅम्पस मुलाखतीमध्ये वरील मत प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी व्यक्त केले पुढे बोलताना त्यांनी अशा कॅम्पस मुलाखतीतून विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात म्हणूनच महाविद्यालय कॅम्पस मुलाखतीचे नियमित आयोजन करीत असते.
सदरील कॅम्पस मुलाखतीसाठी मुंबई येथून आणि अमरावती येथून श्रीमती दिव्या मॅडम , प्रतिभा गजभिये, इंदिरा पावरा प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी एकूण १८ विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली ,यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी लवकरच महाविद्यालयास कळवण्यात येणार आहे.
सदरील कॅम्पस मुलाखतीचे आयोजन प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेलचे कन्व्हेनर प्रा. डॉ. सुदाम जी. राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

