प्रकाश नाईक काठी, ता. अक्कलकुवा : अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या उपस्थितीत व हस्ते काठी येथे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला.
यावेळी माजी सरपंच विक्रमसिंग दादा वसावे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजयसिंग दादा वसावे, लक्ष्मण वसावे, निजऱ्या वसावे, उमेद पाडवी, काँग्रेसचे समर्थक रामचंद्र जिरा वळवी, रतनसिंग नाईक, विक्रम टेलर, विरसिंग दादा कामदार, सोना महाराज, नारसिंग दादा पाडवी, फुलसिंग वळवी, दिलवरसिंग नाना पाडवी, विक्रमसिंग जात्र्या तडवी, जेकमसिंग केसरसिंग तडवी, दिलवरसिंग सोमा तडवी, कुशा वसावे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेत पक्षात प्रवेश केला.
यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध गावांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही आमदार पाडवी यांनी सांगितले. गरजू नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास काठी गावातील नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

