गणेश उत्सवानिमित्त बालविवाह, बालमजुरी व बाल तस्करी यांवर जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन आणि कार्ड कडून जनजागृती

बोरवण.दिनांक 16. युवा गणेश मंडळ,बोरवण.ता.धडगाव, जि.नंदुरबार येथे 16 सप्टेंबर 2026 रोजी जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन आणि कार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह,बालमजुरी, बाल तस्करी या विषयांवर जनजागृती कार्यक्रमात उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधक कायदा,बालमजुरी प्रतिबंधक कायदा याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बाल तस्करी पासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी,बालविवाह व बाल मजुरीचे मुलांच्या जीवनावर होणारे परिणाम याबाबत कार्ड च्या तालुका समन्वयक अंजली पावरा यांनी मार्गदर्शन केले. सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट (CARD),जालना चे अध्यक्ष प्रा सुवर्णा दांडगे, उपाध्यक्ष प्रा.डॉ.रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यात जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या नेटवर्क ची भागीदार संस्था म्हणून बालकांचे हक्क व संरक्षण काम जुलै 2024 पासून करीत आहे. 

   यावेळी उपस्थित गावातील युवा व महिला सहभागी यांनी बालविवाहाला विरोध दर्शवून आपल्या गावात बालविवाह होऊ देणार नाही, तसेच बालकांच्या संरक्षणासाठी आवश्यक सहकार्य करू, असा सकारात्मक संकल्प व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार