धनगरवाडी येथे महापोषण अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न

*धुळे प्रतिनिधी* धनगरवाडी, धुळे | ०९ सप्टेंबर २०२६समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास विभाग प्रकल्प अंतर्गत महापोषण अभियान कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, धुळे यांच्या सहकार्याने अंगणवाडी केंद्र क्र. ३, धनगरवाडी येथे उत्साहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राहुल जाधव सर, सामुदायिक आरोग्य अधिकारी हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उमाकांत पाटील सर, जिल्हा समन्वयक मानसिक आरोग्य कार्यक्रम उपस्थित होते. तसेच संजय लोटे सर, आरोग्य कर्मचारी, ANM मोनाली पाटणकर मॅडम, अंगणवाडी सेविका मंगला गायकवाड मॅडम आणि आशा वर्कर ज्योती देवरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वागत गीत सादर करण्यात आले. स्वागत गीतानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्ष डॉ. राहुल जाधव सर यांचे स्वागत अंगणवाडी सेविका मंगला गायकवाड मॅडम यांनी केले. डॉ. उमाकांत पाटील सर यांचे स्वागत विद्यार्थी विपुल वेलगा यांनी केले. ANM मोनाली पाटणकर मॅडम यांचे स्वागत विद्यार्थिनी पठाण मुस्कान यांनी केले. संजय लोटे सर यांचे स्वागत विद्यार्थिनी नदीम पटेल यांनी केले, तर आशा वर्कर ज्योती देवरे मॅडम यांचे स्वागत विद्यार्थिनी रूपाली ठाकरे यांनी केले.

यानंतर ANM मोनाली पाटणकर मॅडम यांनी गरोदर माता व स्तनदा माता यांना पोषण, आरोग्याची काळजी, संतुलित आहार आणि माता-बाल आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. उमाकांत पाटील सर यांनी पोषणाचे महत्त्व, मानसिक आरोग्य आणि कुटुंबातील आरोग्यविषयक जागरूकतेबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुल जाधव सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पोषण, स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि नियमित आरोग्यविषयक काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. महापोषण अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये पोषणाबाबत जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, बालके, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनी पाडवी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पठाण मुस्कान यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, माता, बालके तसेच समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजक

पटेल अमीन, पटेल शाबान, पठाण मुस्कान, मोनी पाडवी, पटेल नदीम, विपुल वेलगा, सोनवणे दामली, वडवी मेहक, वसावे रूशा.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार