हे संपूर्ण जिल्हास्तरीय अभियान युवक क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रुपसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रदेश सरचिटणीस ॲड. दीपक वसावे व जिल्हाध्यक्ष इंजि. संदीप वळवी यांनी जिल्हाभरात एकाच दिवशी सर्व तालुक्यांमध्ये निवेदन देण्याचे कायदेशीर व संघटित नियोजन करून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. वनपट्टेधारकांचा हा लढा पूर्ण होईपर्यंत 'युवा क्रांती' सामाजिक संघटना सातत्याने लढत राहील, असा ठाम निर्धार या प्रसंगी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शासकीय परिपत्रकातील स्पष्ट निर्देशानुसार ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पात्र वनहक्कधारकांना ७ ई / १२ ई नमुन्यातील उतारे प्रदान करणे बंधनकारक आहे. महसूल व वन विभागाने परस्पर समन्वयाने अचूक नोंदी तयार करून कोणत्याही तांत्रिक त्रुटीचे कारण पुढे न करता हे उतारे तात्काळ वितरित करावेत, अन्यथा जिल्ह्यात तीव्र 'रस्ता रोको आंदोलन' छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
या जिल्हास्तरीय मोहिमेत तळोदा येथे उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी व तळोदा तहसीलदार यांना यांना निवेदन सादर करताना प्रदेश मुख्य समन्वयक विजयसिंग पाडवी, तालुकाध्यक्ष प्रमोद वळवी, तालुका सरचिटणीस सोहम वळवी, तसेच विजय नाईक, चाहित वळवी, जगदीश वसावे, सिद्या वळवी व महेश वसावे उपस्थित होते. नवापूर येथे तहसीलदारांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष अविनाशदादा गावित, तालुका उपाध्यक्ष आकाशदादा गावित, योगेश गावित, सुरेश गावित, अंकुश गावित, अमोल गावित, जेमस गावित, रिनेश गावित, अविनाश जे. गावित व राहुल गावित उपस्थित होते. धडगाव येथे तहसीलदारांना निवेदन देताना धडगाव तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाडवी, प्रदेश संघटक मंगेश वळवी, रविंद्र वळवी, सुरेश वळवी, अमिताभ वळवी, उदेसिंग पराडके व रमेश पाडवी उपस्थित होते. अक्कलकुवा येथे तहसीलदारांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष धिरसिंग वसावे, इंजि. खुमानसिंग तडवी, महेश वसावे व सागर वळवी उपस्थित होते. तसेच शहादा येथे तहसीलदारांना निवेदन देताना इंजि. गणेश पवार, इंजि. मनोज वसावे, हर्षल पवार, सुनिलाल, सागर पवार व करमसिंग वळवी उपस्थित होते.
युवा क्रांती संघटनेच्या या आक्रमक व अत्यंत नियोजित भूमिकेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात वनपट्टेधारक आदिवासी बांधवांमध्ये आपल्या हक्कांप्रति नवा उत्साह निर्माण झाला आहे.

